शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना शुक्रवारी त्यांचा मृतदेह सापडला. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले धोडी यांची हत्या करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या महिन्याच्या २० तारखेपासून धोडी हे गायब होते. त्यांची गाडीही सापडत नव्हती. पण शुक्रवारी दगडाच्या खाणीतील तलावात त्यांची गाडी आणि त्या गाडीतील डिक्कीत त्यांचा मृतदेह सापडला.
यासंदर्भात पोलिसांनी चार जणांन अटक केली आहे. त्यांच्याकडूनच कदाचित पोलिसांना ही माहिती मिळालेली असू शकते. त्यातून पोलिसांनी तपास करत धोडी यांची गाडी आणि त्यांचा मृतदेह शोधून काढला.
गुजरातमधील भिलाडजवळ असलेल्या सरिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत ही कार पडलेली असल्याचे स्पष्ट झाले होते. ती कार धोडी यांचीच असल्याचे समोर आले. जवळपास दोन ते तीन तास या खाणीत शोधकार्य हाती घेण्यात आले.
हे ही वाचा:
असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!
पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद!
फडणवीस-शिंदेना अडकवण्याचा डाव, SIT स्थापन!
ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले
पाणबुडे या गाडीचा आणि धोडी यांच्यासंदर्भातील पुराव्यांचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना एक जॅकेट आणि इअरफोन सापडले. त्यानंतर धोडी यांची गाडीही सापडली.
खाणीतील पाणी खोल असल्याने गाडी काढण्यात अडचणी येत होत्या पण अखेर त्यावर मात करत ही गाडी हाती लागली. त्याच्या डिकीतच धोडी यांचा मृतदेह पोलिसांना आढळला.
अभिनेता अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटातही असे दृश्य दाखविण्यात आले होते. मात्र त्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह गाडीत नसतो. मात्र अशाच पद्धतीने एका खाणीत गाडी सोडून देण्यात आल्याचे दृश्य दाखविण्यात आले होते. त्याची आठवण या घटनेच्या निमित्ताने येत आहे.