अंधेरीतील मुलीचा मृतदेह सापडला वसईत

अंधेरीतील मुलीचा मृतदेह सापडला वसईत

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

अंधेरीतील एका मुलीचा मृतदेह वसईत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. तीक्ष्ण हत्याराने या मुलीच्या पोटावर वार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. वसईतील झाडाझुडपात हा मृतदेह पिशवीत बांधलेल्या अवस्थेत सापडला.

वालीव पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला असून रस्त्यावरून जात असलेल्या एका प्रवाशाने ही माहिती वालीव पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी ही कारवाई सुरू केली. ही मुलगी १४ वर्षांची असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.

दुपारी चार वाजता वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या ठिकाणी एका प्रवाशाला ही बॅग आढळली. त्यातून वास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना कळविले. त्या मुलीच्या पोटात सुरा खुपसल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह चादरीत बांधून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता.

हे ही वाचा:

१० महिने पगार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा वाली कोण?

मढमधील स्टुडिओला मुंबई पालिकेकडून बेकायदेशीर घोषित

भारतीय सैनिकांनी रक्त देऊन वाचवले दहशतवाद्याचे प्राण

लफडीच लफडी चहूकडे, गं बाई गेला पाटकर कुणीकडे???

ही मुलगी अंधेरीची असून तिथेही एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही मुलगी काल शाळेत जाते म्हणून निघाली होती. पण ती शाळेत गेली नाही आणि घरीही पोहोचली नसल्याने अंधेरी पोलीस ठाण्यात रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.  आता वसईत मृतदेह सापडल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याची माहिती वालीव ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली आहे.

Exit mobile version