मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी दोन जणांचे मृतदेह आढळुन आले आहेत. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या एका जीवरक्षकाला दोन मृतदेह दिसले. हे दोन्ही मृतदेह एकमेकांपासून सुमारे १०० मीटर अंतरावर होते. मृतदेह असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकाने याची माहिती तातडीने पोल्स नियंत्रण कक्षाला दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी दिली आहे. या दोघांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा दिसल्या नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!
जम्मू काश्मीरचा बेपत्ता जवान अखेर सापडला
लवासाचा सौदा हा दृश्यम् पार्ट थ्री??
कापसाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडसे- महाजन यांच्यात जुंपली
दीपक बिश्त (वय २५ वर्षे) आणि त्याचा चुलत भाऊ हरदेव सिंग (वय २६ वर्षे) असे या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मुळचे हरियाणामधील आहेत. या दोघांजवळ असलेल्या आधारकार्ड वरून दोघांची ओळख पटविण्यात आली आहे. दोघांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असून दोघे काही वर्षांपासून चेन्नई कामासाठी गेले होते मात्र, मुंबईत कधी आले याबाबत काहीही कळू शकले नाही, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.