अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी दानिश चिकना उर्फ दानिश मर्चंटला डोंगरीच्या डोंगरीच्या टनटनपुरा स्ट्रीट येथून त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. डोंगरी भागात दाऊदच्या ड्रग्ज ऑपरेशन्सचे व्यवस्थापन बघणारा कादर गुलाम शेख असे दानिशच्या साथीदाराचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश मर्चंट हा लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील एका प्रकरणातील फरार आरोपी होता. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गेल्या महिन्यात मोहम्मद आशिकुर सहिदुर रहमान आणि रेहान शकील अन्सारी या दोन जणांना अमली पदार्थासह अटक केली होती, त्यांच्या चौकशीत दानिश चिकना आणि कादर गुलाम शेख यांचे नाव समोर आले होते.
हे ही वाचा :
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात
उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…
जे आपल्याकडे होते ते उद्या नसेल…मी नाराज नाही!
८ नोव्हेंबर रोजी रहमानला मरीन लाइन्स रेल्वे स्थानकाजवळ जवळ १४४ ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली होती, त्यानंतर अटकेची साखळी सुरू झाली. चौकशीदरम्यान रहमानने हे अमली पदार्थ डोंगरी येथील अन्सारी यांच्याकडून आणल्याचे उघड झाले. या माहितीवरून कारवाई करत पोलिसांनी अन्सारी याला अटक करून ५५ ग्रॅम अतिरिक्त अमली पदार्थ जप्त केले. अन्सारीने या ड्रग्जचा पुरवठा दानिश मर्चंट आणि अन्य सहकारी कादिर फंटा यांनी केल्याचा खुलासा केला.
पोलीस अनेक आठवड्यांपासून मर्चंट आणि फंटा यांचा शोध घेत होते. एका गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी डोंगरी परिसरात दोन्ही संशयितांना शोधून काढले. काळजीपूर्वक नियोजित ऑपरेशनमुळे त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत दोघांनी ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. २०२९ मध्ये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने डोंगरी येथील दाऊदचा ड्रग कारखाना उद्ध्वस्त केला आणि कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. त्यावेळी, मर्चंटला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याची नुकतीच सुटका होईपर्यंत तो तुरुंगात होता.