दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला बुधवारी एका ड्रग्स कन्साईमेंट प्रकरणी अटक केली आहे. एनसीबीने जम्मू काश्मीर येथून मुंबईत आणण्यात आलेला चरस हा ड्रग्ससह दोघांना नुकतीच अटक केली होती, यादोघांच्या चौकशीत इक्बाल कासकर याचे नाव पुढे आल्यामुळे इक्बाल कासकर याला बुधवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

एनसीबीच्या मुंबई पथकाने काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथून मुंबईत दोन मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीतून आणण्यात आलेला चरस या अमली पदार्थासह गुरुमित सिंग आणि रवींद्र सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीत चोर कप्पे तयार करून हा चरस मुंबईत आणला होता.

हे ही वाचा:
वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

तुंबलेल्या नदीतील कचरा काढण्याचा खर्च प्रवाही

निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन

ठाकरे सरकारची आता राष्ट्रवादीच्या निर्णयालाही स्थगिती

या प्रकरणात या दोघांची एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याचे नाव समोर आले. इक्बाल कासकर हा ठाणे तुरुंगात असून त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. दरम्यान एनसीबीने चरस प्रकरणी चौकशी  करण्यासाठी बुधवारी प्रोडक्शन वॉरंटवर इक्बाल कासकर याचा ताबा ठाणे तुरुंगातून घेतला आहे.

याप्रकरणी त्याला अटक करून त्याच्याकडे याबाबत कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एनसीबीचे संचालक वानखेडे यांनी दिली आहे. ड्रग्सच्या तस्करीतून येणार पैसा हा टेरर फंडासाठी वापरला जात असल्याचा संशय एनसीबीला असून या प्रकरणी इक्बाल कासकर यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत मोठा खुलासा होण्याची शक्यता एनसीबीकडून वर्तवली जात आहे.

Exit mobile version