23 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामाउरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी

उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी

पोलीस करणार चौकशी

Google News Follow

Related

उरण येथील यशश्री शिंदे हत्येप्रकरणी पोलिसांनी कर्नाटक येथून मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस ठोकडी सुनावली आहे. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढे पोलीस दाऊदची चौकशी करणार असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे.

उरणमधील यशश्री शिंदे ही तरुणी २५ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा शोध सुरु केला होता. पोलिसांना यशश्रीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. पोलिसांनी यशश्री शिंदे हत्येप्रकरणी मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस ठोकडी सुनावली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर यशश्रीचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दाऊद शेखर संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून त्याला ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनीयेह ठार

अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १४५ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू

अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद

उरण येथे राहणारी यशश्री शिंदे ही कॉर्मसमधून पदवीधर असलेली यशश्री एका खासगी कंपनीत नोकरीला होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असं तिने तिच्या पालकांना सांगितलं. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पुढे शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना कोटनाका परिसरात एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. यशश्रीच्या पालकांनी कपड्यांवरुन आणि तिच्या शरीरावरील टॅटूमुळे मृतदेह तिचाच असल्याची ओळख पटवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा