22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाविकृत दाऊद शेखने २०१९मध्येही यशश्रीला छळले होते...

विकृत दाऊद शेखने २०१९मध्येही यशश्रीला छळले होते…

एफआयआरमधून विकृतीचा नंगा नाच आला समोर

Google News Follow

Related

उरण येथे यशश्री शिंदे या युवतीचे अपहरण करून अत्यंत निर्घृण खून प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकहून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधातील एफआयआरमध्ये गंभीर बाबी समोर आल्या आहेत. दाऊद शेख याने यशश्रीची निर्घृणपणे हत्या केलेली असल्याचा आरोप आहे. एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये यशश्रीच्या मागेमागे चालताना तो दिसत आहे. यानंतरच तिची हत्या झालेली आहे.

२६ जुलैला यशश्रीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी दाऊदचा शोध घेण्यासाठी ८ पथके तयार केली. यासंदर्भात २७ जुलैला अज्ञात इसमाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यात म्हटले आहे की, २५ जुलैला यशश्री हरवली होती. बेलापूर येथील एएमआयआय बिझनेस सपोर्ट कंपनीत ती काम करत होती. त्या दिवशी तिला सुट्टी होती. आपल्या मित्रांसोबत बाहेर जात असल्याचे सांगून ती बाहेर पडली. पावणे आठपर्यंत ती घरी परतली नाही म्हणून तिच्या पालकांनी तक्रार दाखल केली. उत्तर रात्री २ वाजता पोलिसांनी कुटुंबाला फोन करून बोलावले. उरण तालुका येथील कोटनाका येथे एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. तो मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. चेहराही ठेचून विद्रुप करण्यात आला होता. पण तिच्या कपड्यांवरून वडिलांनी यशश्रीचा मृतदेह ओळखला. ही आपलीच मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, त्या मृतदेहावर अनेक ठिकाणी शिवाय, गुप्तांगांवर धारदार शस्त्रांच्या सहाय्याने वार केल्याच्या खुणा होत्या. पोटावर आणि छातीवर वार केले होते. तिला इंदिरा नगर स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रुग्णालयातील डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील

उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांकडे ढुंकूनही पाहिले नाही; आंदोलक भडकले !

विक्रमवीर विश्वेश लेले यांचा गौरव !

तिचा विनयभंग केल्याप्रकरणी २०१९मध्ये दाऊद शेखविरोधात करण्यात आलेला एफआयआरसुद्धा समोर आला असून त्यातही गंभीर स्वरूपाचे आरोप या दाऊद शेखविरोधात आहेत. ऑप इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार यशश्रीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात ३५४ (महिलेचे शीलहरण करण्यासाठी जबरदरस्ती करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी कृत्य करण्याचा इरादा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प़ॉक्सोअंतर्गतही कलमे लावण्यात आली होती. कारण त्यावेळी यशश्री ही अवघी १५ वर्षांची होती.

त्यात म्हटले होते की, आरोपी दाऊद हा तिच्या मागे लागत असे. तिच्यासोबत वेळ घालविण्यासाठी तिला धमकावत असे. आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी तिला जबरदस्ती करत असे. यशश्रीशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आले होते. यशश्रीने त्याला विरोध केला. पण तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता.

या तक्रारीनंतर दाऊदला पकडण्यात आले आणि विनयभंगाच्या आरोपाखाली सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर तो कर्नाटकला गेला. तिथून त्याने यशश्रीचा खून करण्याच्या इराद्याने पुन्हा नवी मुंबईत प्रवेश केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा