उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या

यशश्री शिंदे हिची केली होती हत्या

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या

उरण येथील यशश्री शिंदे हत्येप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. त्याला आता नवी मुंबई आणले जात आहे. मागील चार दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता. यासाठी पोलिसांनी पाच पथके केली होती. हत्येनंतर २५ जुलै रोजी तो फरार झाला होता. दाऊद शेखचे शेवटचे लोकेशन कर्नाटकातील होते. यावरुन पोलिसांनी त्याचा मग काढला.

शुक्रवारी रात्री उशिरा उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर यशश्रीचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दाऊद शेखर संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून त्याला ताब्यात घेतले आहे. दाऊद याचे शेवटचे लोकेशन कर्नाटक होते. त्यानंतर त्याने मोबाइल बंद केला होता. टेक्निकल बाबींच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायलयात हजर करुन पोलीस कठोडी मागण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

हावडा-मुंबई एक्स्प्रेसला झारखंडमध्ये अपघात; १८ डबे रुळावरून घसरले

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी कपाळावर हात मारला!

उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!

उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहाद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

उरण येथे राहणारी यशश्री शिंदे ही कॉर्मसमधून पदवीधर असलेली यशश्री एका खासगी कंपनीत नोकरीला होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असं तिने तिच्या पालकांना सांगितलं. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पुढे शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना कोटनाका परिसरात एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. यशश्रीच्या पालकांनी कपड्यांवरुन आणि तिच्या शरीरावरील टॅटूमुळे मृतदेह तिचाच असल्याची ओळख पटवली. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे दाऊद शेखवर संशय व्यक्त केला होता. यावरून पोलिसांनी कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Exit mobile version