25 C
Mumbai
Friday, January 17, 2025
घरक्राईमनामादाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात दाखल

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात दाखल

ईडीने कासकरला या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती.

Google News Follow

Related

फरारी गुंड दाऊद इब्राहिमचा तुरुंगात असलेला भाऊ इक्बाल कासकर याला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर मुंबईतील सरकारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासकरला शनिवारी दुपारी अचानक छातीत दुखायला लागल्यावर नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातल्या विभागात उपचार सुरु असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कासकरला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. ईडीने त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले होते जेथे त्याच्यावर अनेक खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकर याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता आणि २०१७ मध्ये याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कासकर सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन काेठीडीत आहे. कासकर याच्यावर गंभीर गुन्हे फारसे नसल्याने ताे पाकिस्तानातून भारतात परतला हाेता.

हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

इक्बाल कासकर त्याचा भाऊ दाऊद इब्राहिमची प्रतिमा जागतिक दहशतवादी म्हणून वापरून सेलिब्रिटी आणि बिल्डर्सकडून खंडणी उकळत असल्याचा अहवाल ईडीने काही महिन्यांपूर्वी दिला होता. कासकर हा दाऊद चालवणाऱ्या टोळीचा महत्त्वाचा सदस्य असून धमकावणे, खंडणी उकळणे यासारख्या कारवायांमध्ये सामील असल्याचेही यात म्हटले आहे.

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध एनआयएने एफआयआर नोंदवला होता. ईडीने मुंबईतील दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले होते. यामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह अनेक नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात हाेते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा