राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुरेशी तथा सलीम फ्रूट याला अटक केली. याच प्रकरणात सध्या महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईडीने सलीम फ्रूटची चौकशी केली होती. दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली होती.
ईडीची चौकशी सुरू असताना मुंबईत किती मालमत्ता आहे, याची चौकशीही करण्यात आली. १४ मे रोजी एनआयएने सलीम फ्रूटला ताब्यात घेतले आणि त्याने तसेच दाऊद इब्राहिमच्या इतर सहकाऱ्यांनी कशा पद्धतीने जमीन खरेदी केली याची माहिती घेतली.
छोटा शकील हा गुंड १९९५-९६ मध्ये भारत सोडून पाकिस्तानात पळाला. छोटा शकील खंडणीचे रॅकेट चालवत असे. त्याच्यासोबत फहीम मचमच, नाजिद भरुची, नासिर कालिया हे गुंड होते, अशी माहिती देतानाच फ्रूटने दाऊद इब्राहिम व छोटा शकील हे कराची येथे राहात असल्याचेही जाहीर केले.
हे ही वाचा:
७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे गाणे अमिताभ, सोनू निगम, विराटच्या मुखी
आता पंधरा डब्यांच्या लोकलमध्ये स्वेटर घाला
चोरांनी वृद्धाला लुटले पण पोलिसांना धडकले
संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली
एनआयएने ३ फेब्रुवारी २०२२ ला गुन्हा दाखल केला. त्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा आरोप करण्यात आला. या एफआयआरमध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील. हाजी अनिस, जावेद चिकना यांची नावे होती.
सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. सलीम फ्रूट हा पूर्वी फळे विकण्याचा धंदा करत असे. सलीम फ्रूटने दाऊद आणि मंडळींना भेटण्यासाठी तीन ते चार वेळा पाकिस्तानची भेट घेतलेली आहे, अशी माहिती समोर आली आहे.