ईडीकडून नुकतेच अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांची मुलगी प्रियदर्शिनी मल्लिक हिने २०१६ च्या नोटाबंदीनंतर आपल्या बँक खात्यात तब्बल ३.३७ कोटी रुपये जमा केल्याची माहिती समोर आली आहे. प्रियदर्शिनी मल्लिकने तिच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यात मोठ्या प्रमाणात ‘बेहिशेबी पैसे’ जमा केले होते.प्रियदर्शिनी मल्लिक ही व्यवसायाने शाळेतील शिक्षिका असूनही त्या वर्षी तिचा वार्षिक पगार फक्त ₹ २.४८ लाख इतका होता.तसेच ईडीला ज्योती प्रिया मल्लिकची पत्नी मंडिपा मल्लिक हिच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यात ₹ ४.३ कोटी रोख रक्कम देखील आढळून आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाकडून तिची चौकशी केली असता तिने सांगितले की, माझ्या शिकवणीतून हे पैसे कमावले आहेत.शिकवणुकीतून ३ कोटींहून अधिक रक्कम कमावल्याचा दावा तिने केला आहे.
या प्रकरणाबद्दल बोलताना एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.ते म्हणाले, “प्रियदर्शिनी एक शाळेतील शिक्षिका आहे आणि तिने दावा केला आहे की ही सर्व रक्कम शिकवणीतून कमावली आहे. त्या आर्थिक वर्षात तिचा वार्षिक पगार २.४८ लाख रुपये” होता.
हे ही वाचा:
भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!
इस्रायलने जाहीर केले करा अथवा मरा! हमासविरोधातील लढाई दुसऱ्या टप्प्यांत
गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र
कोचीमध्ये ख्रिस्ती प्रार्थनासभेत स्फोट, एक व्यक्ती ठार
ईडीच्या तपासात ज्योती प्रिया मल्लिक यांची पत्नी मंदिपा मल्लिक हिच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यात ₹ ४.३ कोटी रुपयांच्या रोख ठेवी उघडकीस आल्या आहेत.शुक्रवारी,२७ ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाकडून ज्योती प्रिया मल्लिक याना अटक करण्यात आली.ज्योती प्रिया मल्लिक ‘अन्न मंत्री’ होते तेव्हा सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) घोटाळ्यामध्ये ते सहभागी होते, या प्रकरणी मल्लिक याना ईडीने अटक केली.
शेल कंपन्यांच्या वेबद्वारे ९५ कोटी रुपयांची लाँड्रिंग केल्याचा आरोप मल्लिक यांच्यावर आहे.ज्योती प्रिया मल्लिक यांना ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान याआधी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय एजन्सीवर जोरदार टीका केली व तृणमूलच्या वरिष्ठ नेत्याला कोणत्याही प्रकारे इजा झाल्यास पोलिस कारवाई करण्याची धमकी दिली होती.