दुबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भारतीय इसमाने सोन्याची तस्करी करण्यास नकार दिल्याने आरोपींनी पिडीत इसमाच्या मुलीला धमक्या देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका भारतीय व्यक्तीला दुबई विमानतळावर काही माणसांनी अडवले. त्यांना एक बॅग मुंबईला घेऊन जाण्याची त्यांनी त्या इसमाला विनंती केली. त्यामुळे तो इसम ती बॅग घेऊन मुंबईला आला. मुंबई विमानतळावर पोहचल्यावर त्या इसमाला संशय आला म्हणून त्यांने ती बॅग उघडून पहिली. तर त्यामध्ये चक्क सोन असल्याचं आढळून आले. बॅगेत बेकायदेशीर सोन आढळल्याने ती बॅग तो इसम विमानतळावरचं टाकून पळून गेला. इसमाने बॅग विमानतळावर टाकल्याने आरोपींना याचा राग आला आणि त्यांनी त्या इसमाच्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. चार आरोपी त्या इसमाच्या १७ वर्षीय मुलीला त्रास देत होते.
उमर, जावेद सय्यद पापा उर्फ काफिया आणि आरोपी महिला समीना यांनी त्या मुलीला गहरी जाऊन धमकावले. उमर आणि समिना यांनी मुलीला रस्त्यात अडवून तिला अयोग्य स्पर्श केला आणि तिचे केस ओढले. याप्रकरणी विनयभंग, खंडणी, बदनामी आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.
जर त्या इसमाने ते सोने परत घेऊन आरोपींना दिले नाही तर त्यांच्या मुलीचे अपहरण करून खून करू अशी धमकी दिली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. आरोपी काफियाने कथितपणे तिच्या वडिलांचा फोटो वापरून ‘सोना लेकर फरार’ असा व्हाट्सअप मेसेज तयार केला होता आणि ते व्हायरल केले. पोलीस या घटनेची तपासणी करत आहेत. तसेच याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!
या चारही आरोपींवर कलम ३५४ (विनयभंग), ३५४ डी (पाठलाग), ३८५ (कोणत्याही व्यक्तीला भीती दाखवून खंडणी उकळणे), ३४१ (चुकीचा प्रतिबंध), ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५०० (बदनामी) आणि भारतीय दंड संहितेचे ३४ (सामान्य हेतू) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम ८ आणि १२ लावण्यात आले आहे.