एमपीएससी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याने तिची हत्या कशी केली याची कबुली दिली आहे. लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हंडोरे याने सोमवार, २६ जून रोजी पोलिसांना दिली.
एमपीएससीच्या परीक्षेसाठी दर्शना आणि राहुल दोघे एकत्र अभ्यास करत होते. यादरम्यान राहुलने दर्शनाला प्रपोज केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दर्शनाला मदत केली. परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला. याचाच राग डोक्यात ठेवून राहुल याने दर्शनाची हत्या केली. कंपासमधील कटरचा वापर करून राहुल ने दर्शनावर हल्ला केला. वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर त्याने दगडाने वार करून तिची हत्या केली. याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दर्शना एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली होती.
हे ही वाचा:
“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!
सूरज चव्हाणचा, सुशांत सिंग राजपूत तर होणार नाही ना?
सदावर्तेंनी केली परतफेड; ‘शरद पवार’ पॅनेलला केले पराभूत
अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट
१८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती मित्र राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला २१ जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी दरम्यान राहुलने हत्येची कबुली दिली.