पाटणा येथील शाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दियारा येथील मकसूदपूर गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.तर या हल्लयात आणखी एक तरुण जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून दोन गोळ्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी दानापूर उपविभागीय रुग्णालयात पाठवला असून पोलिसांनी चार संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात प्रामुख्याने चार जणांची नावे समोर येत आहेत.
या संदर्भात पाटणा ( पश्चिम) एसपी अभिनव धिमान यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी एका गटाने बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्यानंतर परिसरातील शाळेजवळील सरकारी जागेवर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसण्याचा प्रस्ताव दिला.पुतळ्याचा प्रस्तावाला गावातील दुसऱ्या गटाने विरोध दर्शविला आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.तीन दिवस शांततेचे गेले.मात्र, त्यानंतर रात्रीच्या वेळेस दोन्ही गटाकडून हाणामारी, दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.
हे ही वाचा:
मणिपूर मतदान केंद्रावर गोळीबार, कव्हरसाठी मतदारांची धावपळ!
पहिल्यांदा मतदान केलेत, आता एअर इंडिया एक्स्प्रेसमधून करा स्वस्तात प्रवास!
सुनेला हिणवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस!
‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’
ते पुढे म्हणाले, या हिंसाचारात एका गटाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.या गोळीबारात विक्रम कुमार (१९ ) या दलित तरुणाच्या चेहऱ्यावर एक गोळी लागली.तर उदय कुमार(२४) याच्या डोक्याला दगड लागल्याने जखम झाली.दोघांना दानापूरच्या उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, गोळी लागलेला विक्रम कुमार याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर उदयला पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले.पोस्टमॉर्टमनंतर विक्रमचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.