दादरमध्ये चोरांनी लोकल रेल्वेच्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून चोर पसार झाला. मात्र चोरी करणाऱ्या चोराला दादर रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद केले. तसेच गुन्हेगारी पटलावर असलेल्या चोराच्या घरात झडती घेतली असता ४६ ग्राम वजनाचे मंगळसूत्र व अन्य दागिने आढळले. मंगळसूत्राची बाजारातील किंमत सव्वा दोन लाख रुपये आहे व पोलिसांनी दागिना जप्त केले आहेत.
तक्रारदार महिला ७ सप्टेंबर रोजी अनुषा मूलकूट या कार्यालयात जाण्यासाठी दादरच्या फलाट क्रमांक एक वरून डोंबिवलीच्या दिशेने जाणारी लोकल रेल्वे पकडत होत्या. त्याच दरम्यान लोकल रेल्वेच्या गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी अनुषा यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले. त्याच दिवशी कार्यालयात महत्वाचे काम असल्याने त्वरित तक्रार दाखल केली नाही. मात्र उशिरा हा होईना त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच रेल्वे पोलीसांनी ताबडतोब तपास सुरु केला.
हे ही वाचा:
जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला
‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’
सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट
फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यात पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शेखर शिंदे असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी आरोपी शेखर शिंदे याला चेंबूर सिद्धार्थ कॉलनीतील राहत्या घरातून आरोपी शिंदेला ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता शिंदे याने गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपी शिंदेला अटक करत आरोपीच्या घरातून सोन्याची चेन, मंगळसूत्र असे एकूण ४६ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.