१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!

१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!

१०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी दादर पोलिस ठाण्याने चारजणांना अटक केली आहे. हे चारही जण कर्नाटकचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१४ जुलैला गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सपोनि रामकृष्ण सागडे, हवालदार रावराणे, पाटणे, महाडिक, आंधळे, कोलते, हे शासकीय वाहनाने गस्त घालत असता एक इसम परळ एसटी डेपोच्या परिसरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगत असल्याची आणि त्या वापरत असल्याची खबर मिळाली.

परळ येथून आनंद ममदापूर याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे ११ रुपयाच्या १२ बनावट नोटा मिळाल्या. त्याची चौकशी केल्यावर तो राहात असलेल्या ठिकाणी १०० व २०० रुपयाच्या आणखी नोटा मिळाल्या ज्यांची किंमत ४३८०० इतकी होती. त्याच्याकडून हे स्पष्ट झाले की, या नोटा कर्नाटकमधील शिवकुमार शंकरकडून मिळाल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी कर्नाटकमधील हुमनाबाद गाठले आणि तिथे शिवकुमार शंकर व त्याचा साथीदार किरण कांबळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात २०० रुपयाच्या १०३ म्हणजे २० हजार ६०० रुपये मिळाले.

शिवकुमारला विचारणा केल्यावर मुंबईतील आकाश तडोलगीकडे १०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा दिलेल्या असल्याचे त्याने सांगितले. तडोलगीला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे १०० व २०० रुपयाच्या बनावट नोटा होत्या. तसे ३ हजार रुपये त्याच्याकडे होते.

या सगळ्या नोटा या चौघांनी भारतीय बाजारपेठेत आणल्या. या नोटा त्यांनी स्वतः छापल्या होत्या. त्याबदल्यात त्यांना खऱ्या नोटा मिळाल्या. या नोटांची छपाई करण्याचे सामान कर्नाटकमध्ये किरण कांबळेच्या घरात मिळाले. त्यात कलर प्रिंटर, पेपर कटर, साधे कटर, स्टीलची पट्टी, शाईच्या बाटल्या, कागद यांचा समावेश होता.

हे ही वाचा:

‘लालसिंह चढ्ढा’वर प्रेक्षकांची का सटकली?

पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….

धक्कादायक! लांबउडीपटू, क्रिकेटपटू, वेटलिफ्टर, कबड्डीपटूंनी जिंकले लॉन बॉलचे सोने

आमदार संजय शिरसाट यांनी हटविला उद्धव ठाकरेंचा फोटो!

 

पोलिसांनी आता एकूण चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडे १०० रुपयांच्या १५८ बनावट नोटा, २०० रुपयाच्या २६४ नोटा असा एकूण ६८ हजार ६०० रुपयांचा माल सापडला आहे. छपाईचे सर्व साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

हे काम अपर पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उपायुक्त प्रणय अशोक, सहाय्यक पो. आयुक्त अविनाश कानडे, दादरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश मुगुटराव, पो. नि. सागर शिवलकर यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

Exit mobile version