डी – मार्ट मॅनेजरने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट

सीसीटीव्ही फुटेज तपासून एका ठिकाणाहून पोलिसांनी जितेंद्रची सुटका केली

डी – मार्ट मॅनेजरने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट

गोरेगाव पश्चिम येथील डी – मार्ट मध्ये मॅनेजर पदावर असणाऱ्या २७ वर्षीय व्यक्तीने सहकाऱ्याच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडे पाच लाख रुपयाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी अपहरणाचा बनाव केल्याप्रकरणी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

 

जितेंद्र जोशी असे अपहरणाचा बनाव करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. दहिसर पूर्व वैशाली नगर येथे वडील, पत्नी आणि भावासह राहणारा जितेंद्र हा गोरेगाव येथील डी मार्ट मध्ये मॅनेजर या पदावर कामाला होता, त्याच्या वडिलांचे दहिसर येथे दूध पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. मंगळवारी दुपारी कामावर गेलेला जितेंद्र हा रात्री उशीर होऊन देखील घरी न परतल्यामुळे चिंतेत असलेल्या जोशी कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन करून देखील त्याचा फोन बंद लागत असल्यामुळे जोशी कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. दरम्यान मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास जितेंद्रच्या मोबाईल वरून त्याची पत्नी हिच्या व्हाटसअँप वर एक व्हिडीओ आला, त्यांनी तो व्हिडीओ बघितला जितेंद्रचे हातपाय तोंड डोळे बांधून एका खोलीत कोंडून ठेवले होते.

हे ही वाचा:

दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधानांना भेटणार!

पाकला पराभूत करून भारताने रचला हॉकीत इतिहास

मुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना

सचिनने आमच्या तालावर नाचावे अशी अपेक्षा!

काही वेळाने जितेंद्रच्या मोबाईल वरून पत्नीच्या व्हाट्सअँप वर कॉल आला व कॉल करणाऱ्याने ‘तुम्हारा बेटा मेरे कब्जे मे है, अगर बेटा चाहते हो तो ५ लाख रुपये लेकर ओबेरॉय मॉल के पास सुबह ७ बजे लेके आना, पुलिस को इन्फॉर्म किया तो बेटे के जान के जिम्मेदार तुम होगे, या आशयाची धमकी दिली. घाबरलेल्या जोशी कुटुंबीयांनी गोरेगाव डी मार्ट येथे धाव घेऊन जितेंद्र कमला आला होता का याचा तपास करून गेटवरील सीसीटीव्ही तपासले असता रात्री ११ वाजता जितेंद्र बाहेर पडताना दसून आला त्याच्या सोबत डी मार्ट मध्ये काम करणारा कर्मचारी सोबत होता. जोशी कुटुंबीयांनी तात्काळ बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी गुन्हा अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

 

दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासून एका ठिकाणाहून जितेंद्रची सुटका केली व त्याच्याकडे अपहरणकर्त्या बाबत चौकशी केली असता त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एकाच्या मदतीने त्याने स्वतःचे अपहरण करण्याची योजना ४ दिवसापूर्वी आखली होती, हे कळले. त्या कर्मचाऱ्याने त्याला मदत करण्यास नकार दिला असता जितेंद्रने त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती, व त्या कर्मचाऱ्याच्या मदतीने स्वतःचे अपहरण करून वडिलांकडे ५ लाखाची मागणी केली असल्याची कबुली जितेंद्रने पोलिसांना दिली. वडिलांकडून पैसे लाटण्यासाठी त्याने स्वतःचे अपहरणाचा कट आखून वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून जितेंद्र जोशी याला याप्रकरणी अटक केली आहे.

Exit mobile version