नवी मुंबईमध्ये एका डॉक्टर महिलेची लाखोंची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली. त्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सीम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून चोरट्यांनी या महिलेच्या बँक खात्यातून तीन लाख ६० हजारांची रक्कम परस्पर काढून घेतली. या सायबर गुन्हेगाराविरोधात खांदेश्वर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक झालेल्या डॉक्टर पती पत्नीचे नवीन पनवेल इथे रुग्णालय आहे. ८ ऑगस्ट रोजी सायबर चोराने महिला डॉक्टरच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांचे वोडाफोनचे सिम कार्ड ब्लॉक झाले असल्याचे सांगितले आणि या सिमचे केवायसी अपडेट करण्यासाठी मोबाईल क्रमांक पाठवला. दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर केवायसी अपडेट करण्यासाठी त्यांना ऑनलाईन १० रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र ऑनलाईन पेमेंटसाठी कोणतेही ऑनलाईन ऍप्लिकेशन वापरत नसल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर सायबर चोराने सांगितल्यानुसार डॉक्टर महिलेने मोबाईलवर ‘एनी डेस्क’ नावाचे ऍप मोबाईलवर घेतले आणि चोराने सांगितल्याप्रमाणे ११ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले. त्यानंतर सायबर चोरांनी प्रोसेस पूर्ण झाल्याचे सांगून फोन ठेवला.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’
मात्र सायंकाळी महिला डॉक्टरच्या खात्यातून ८९,९९९ रुपये दुसऱ्या खात्यात गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यांनी तात्काळ बँकेच्या कस्टमर केअरला संपर्क साधून नेट बँकिंग सेवा बंद करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ९० हजाराचे तीन करून पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले होते. त्यानंतर सायबर चोरांकडून आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टर महिलेला लक्षात आले आणि त्यांनी यासंबंधीची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात केली.