पुण्यात सायबर घोटाळा पकडला

पुण्यात सायबर घोटाळा पकडला

पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले. बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हाणून पाडला.

डेटा खरेदीवेळी २५ लाख रुपये घेताना १० जणांना अटक करण्यात आली. दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक झाली आहे. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे.

हे ही वाचा:

अमृता फडणविस यांनी केले ठाकरे सरकारला लक्ष्य

मुंबईत कोविडचे थैमान सुरु असताना आदित्य ठाकरे सुट्टीवर?

मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भाजपा नेत्याची मागणी

काही बॅंकांच्या देशभरातील खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन या माहितीची विक्री करण्याचा मोठा डाव पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. या डेटा चोरी आणि विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचवले आहेत.

या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी २५ लाख रुपये स्वीकारताना १० जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघे जण नामांकित कंपन्यांमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत आहेत.

Exit mobile version