चारकोप येथील रोहीणी यांना मोबाईलच्या माध्यमातून एक संदेश आला. तिथून पुढे या महिलेकडून तब्बल सात लाख रुपये उकळण्यात सायबर भामट्यांना यश आले. विविध वस्तूंची विक्री करणारी अनेक संकेतस्थळे सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत. या संकेतस्थळांच्या माध्यमातून लाखो कमवू शकता अशा अनेक जाहिराती आपण पाहतो. परंतु या भूलथापांना बळी पडल्यास आपल्याकडचे लाखो रुपये छू मंतर होतात हे आपल्यालाही कळत नाही.
चारकोप येथील रोहिणी यांना असाच एक मोबाईलवर मेसेज आला. तिथूनच त्यांच्या फसवणुकीची सुरुवात झाली. मोबाइलवर आलेल्या संदेशानुसार फ्लिपकार्ट, एमेझॅन या संकेतस्थळांची लिंक होती. सदर लिंकवर विविध उत्पादनांचे फोटो होते. ही लिंक आपल्या व्हॅटस्एप स्टेटसवर ठेवून ग्राहक जमा करण्यास त्यांना सांगण्यात आले. अशा पद्धतीने त्यांना बोनस तसेच कमिशन देण्याचे आश्वासन दिले गेले. सदर भामट्याने रोहिणी यांना हे सर्व करण्यासाठी त्यांना एक हजार रुपये जमा करावे लागतील असे म्हटले. त्याप्रमाणे रोहिणी यांनी एक हजार जमा करून त्यांनी या व्यवसायास सुरुवात केली.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार
त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही
दोन ते तीन ग्राहक त्यांनी जमवले. त्यानंतर त्यांच्या खात्यावर भामट्याने २०० ते ३०० रुपये जमाही केले. त्यांनी यानंतर अधिक जोमाने काम सुरु केले. अधिक कमिशनच्या नादात रोहिणी यांनी एक नाही तर तब्बल सात लाख रुपये भामट्याकडे ठेवले. त्यांना त्यानंतर अकरा लाख मिळतील असे आश्वासनही देण्यात आले. त्यानंतर मात्र काही कारणांने संबंधित इसमाने म्हणजेच त्या भामट्याने रोहिणी यांना इतकी रक्कम करामुळे देता येणार नाही असे सांगितले कालांतराने या इसमाने रोहिणी यांच्याशी संपर्कही तोडला. त्यानंतर रोहिणी यांचे डोळे उघडले. आपण फसलो आहोत याची त्यांना जाणीव झाली होती. चारकोप पोलिस ठाण्यामध्ये घडलेल्या घटनेविषयी त्यांनी तक्रार नोंदविली आहे.