पोटात लपवल्या होत्या हेरॉईनच्या ३८ गोळ्या

पोटात लपवल्या होत्या हेरॉईनच्या ३८ गोळ्या

देशभरात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले असून सीमा शुल्क विभागाने दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमा शुल्क विभागाने तब्बल ६.९ कोटी रुपयांचे हेरॉईनची जप्त केले आहे. एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली असून ही व्यक्ती युगांडा येथील असल्याचे समोर आले आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडा येथील एक नागरिक उतरला होता. तपासणी दरम्यान या व्यक्तीच्या बॅगेत हेरॉईनच्या ५३ गोळ्या आढळल्या. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने पोटात आणखी हेरॉईनच्या गोळ्या लपवल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या पोटातून ३८ हेरॉईनच्या गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. एकूण ९१ हेरॉईनच्या गोळ्या या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांमध्ये ९९८ ग्रॅम ड्रग्ज होते त्याची किंमत ६.९ कोटी इतकी आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर?

ओमायक्रोन सब व्हेरिएंट BA.2 ची देशात एंट्री

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारांची घोषणा

चीन नरमला; अपहृत तरुणाची करणार सुटका

आरोपी हे ड्रग्ज लपवण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धती शोधत असतात. युगांडा येथील या नागरिकाच्या पोटातून सर्व ३८ गोळ्या काढण्यात आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version