सीमाशुल्क दलाच्या पुणे विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत परदेशी बनावटीच्या सिगारेट्स, इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सचा साठा पकडला असून त्याची किंमत ५१ लाख असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सिगारेट्स चीन, इंडोनेशिया, मलेशिया, संयुक्त अरब अमिरातीतून आणण्यात आल्याचे उघड झाले आहे.
पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोथरुड, बाणेर आणि सिंहगड रोडवरील दुकाने व गोदामांवर छापे टाकले आणि तिथे त्यांना हा सगळा माल सापडला. त्यात परदेशी बनावटीच्या ५१ लाखांच्या सिगारेट्सचा साठा सापडला. विविध देशातून त्या सिगारेट्स आणल्या गेल्या आहेत.
हे ही वाचा:
कुस्तीगीरांच्या आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाची नाराजी
स्वामीराज प्रकाशनतर्फे पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन
मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे तेच १९८०मध्ये दलितांबाबत होत होते!
मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे तेच १९८०मध्ये दलितांबाबत होत होते!
या सिगारेट्समध्ये एसे लाइट्स, मँचेस्टर, बी अँड एच, कॅमल, डेव्हिडॉफ, मॉन्ड, ५५५, मार्लबोरो, डनहिल या ब्रँडचा समावेश आहे. ज्या ई सिगारेट्स सापडल्या आहेत त्या थॅनोस, एल्फकार, युटू, कॅलिबर्न, स्मोक, फ्युमो, जुल यांचा समावेश आहे. या सगळ्या ई सिगारेट्स प्रामुख्याने चीनमधून आणण्यात आल्या आहेत.
पुण्यातील या दुकानांमध्ये अशा प्रकारच्या सिगारेट्स, सिगार, ई सिगारेट्स, हुक्का यांची विक्री होती. पण ही सगळी उत्पादने अनधिकृतपणे आयात करण्यात आले आहेत. भारतातील आयातीसंदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करून या वस्तूंची आयात केली गेल्याचे उघड झाले आहे.
एका अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले की, सध्या यासंदर्भातील तपास सुरू आहे. यात गुंतलेल्या लोकांचा शोध सुरू असून त्याद्वारे ही संपूर्ण गुन्हेगारी साखळी उखडण्याचा प्रयत्न केला जाईल.