राजस्थानमधील करौली शहरात शनिवार, २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त हिंदू संघटनांनी बाईक रॅली काढली होती. ही बाईक रॅली मुस्लीम वस्तीतून जात होती, यावेळी काही उपद्रवींनी बाईक रॅलीवर दगडफेक केली. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती पाहता प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू लावला होता. हा कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करौलीतील घटनेची मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी गंभीर दखल घेतली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत.
शनिवारी राजस्थानमधील करौली शहरात हिंदू नववर्षानिमित्त हिंदू संघटनांनी बाईक रॅली काढली होती. ही बाईक रॅली मुस्लीम वस्तीतून जात असताना काही उपद्रवींनी बाईक रॅलीवर दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली. या पार्श्वभूमवर पोलिसांनी कारवाई करत ४६ जणांना अटक केली असून सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी एकूण २१ दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त केली आहेत. घटनेनंतर २ एप्रिलपासून ४ एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता, परंतु अजूनही परिस्थिती सामान्य नसल्यामुळे कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, राजस्थान काँग्रेसने करौली हिसांचार घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय शोध समितीची स्थापन केली आहे. या समितीत आमदार जितेंद्र सिंह, करौली जिल्ह्याचे प्रभारी ललित यादव आणि रफिक खान यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
तब्बल चार तास मुलांना घेऊन शाळेची बस गायब!
केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला
दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली
नवाब मलिक १८ एप्रिलपर्यंत कोठडीतच
जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, “सरकारी कार्यालये, न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी आणि परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्फ्यू शिथिल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पोलिसांच्या उपस्थितीत दिवसभरात दोन तासांची सूट देण्यात येणार आहे.”