24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाआरोपी इमारतीवरून पडून मृत्युमुखी; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण

आरोपी इमारतीवरून पडून मृत्युमुखी; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण

Google News Follow

Related

गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी आलेल्या गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीची इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरातील निजामपुरा कसाई वाडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडली आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी सदर व्यक्तीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांवर स्थानिकांनी हल्ला करत त्यांना मारहाणही केली. त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर

दंडात्मक कारवाईतून वसूल केलेले पैसे पोलिसानेच लाटले

इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी?

जमील कुरेशी ( वय ३८ , रा. कसाई वाडा ) असे चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जमील याच्यावर गुजरात येथील वापी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात अटक करण्यासाठी शुक्रवारी गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस जमील यास अटक करण्यासाठी गेले असता जमिलचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

विशेष म्हणजे पोलिसांनी जमील यास मारहाण केली व चौथ्या मजल्याच्या खडकीतून खाली फेकून दिल्याचा आरोप जमील याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र घटनास्थळी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी धाव घेत तणाव शांत केला असून मृतदेह शवविच्छदनासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलीस घरात घुसल्यानंतर माझ्या पतीस मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनीच माझ्या पतीला खिडकीतून बाहेर फेकून दिले त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया जमील कुरेशी यांच्या पत्नीने केला आहे. तर मयत जमील कुरेशी यास गुजरात पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस गेले असता जमील चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल व यात कुणी दोषी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भिवंडी परिमंडळ पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, निजामपुरा पो स्टे हद्दीतील कसाई वाडा, भिवंडी येथे आरोपी नामे जमील उर्फ टकला कुरेशी,यास गुजरात राज्य पोलीस पथक व भिवंडी क्राइम ब्रांच पथक पकडण्यास गेले असता सदर आरोपीने इमारतीचे चौथ्या मजल्याचे खिडकीतून उडी मारल्याने त्यास दुखापत होऊन त्यात तो मयत झाला आहे.

पोलिसांवर हल्ला करण्यांविरोधात गुन्हा

सदरची बातमी परिसरात समजताच मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष घटनास्थळी जमा झाले. सदर घटनास्थळी जमावाने पोलीस अधिकारी/अंमलदार यांना घेरून लाथा बुक्याने व दगडाने मारहाण करून दुखापत करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून फिर्याद दिलेवरून निजामपुरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १४६/२१ भादवी कलम ३५३, ३४१, ३३६, ३३२, ३३६, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरबाबत परिस्थिती शांत आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा