तारापूर औद्योगिक वसाहतीतील विराज प्रोफाइल कंपनीत शनिवार, ७ मे रोजी झालेल्या कामगारांमधील राड्यात आणि त्यानंतर पाेलीसांवर झालेल्या हल्ल्यात एकूण १९ पाेलीस जखमी झाले. या घटनेत जमावाने १२ वाहनांचे नुकसान केले. आज येथील परिस्थिती नियंत्रणात असून एकूण २७ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पालघर पाेलीसांनी दिली आहे.
तारापूर येथील औद्योगिक परिसरात असलेल्या कंपनीतील कामगार संघटनेबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवार,७ मे रोजी युनियनच्या १०० हून अधिक कामगारांनी कारखान्याची तोडफोड आणि येथे काम करणाऱ्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसराची तोडफोडही करण्यात आली.
माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी हल्लेखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला. या हल्ल्यात १९ पोलीस जखमी झाल्याची माहिती पालघर पोलिसांचे प्रवक्ते सचिन नावडकर यांनी दिली. त्याचवेळी पोलिसांच्या १२ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग
म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत
‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’
सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’
या घटनेनंतर कारखान्याभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथे तणावाचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पालघर पोलिस प्रवक्त्याने सांगितले. कारखान्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कामगार संघटनेशी अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. मात्र, हा मुद्दा काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.