24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाझारखंडमध्ये गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही

झारखंडमध्ये गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी

Google News Follow

Related

झारखंडमध्ये अंकिता जळीत कांडाची गंभीर दखल घेत झारखंड उच्च न्यायालयाने राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नसून प्रशासनाबद्दल गुन्हेगारांच्या मनात जराही भीती राहिलेली नाही, अशी संतप्त टिप्पणी केली आहे.

झारखंडमध्ये अंकिता या मुलीला शाहरुख या तिच्या शेजारी राहणाऱ्या युवकाने जाळून मारल्याची घृणास्पद घटना घडली. त्यावरून झारखंडमध्ये संताप उसळला आहे. लोकांनी रस्त्यावर धाव घेत गुन्हेगार शाहरुखला फाशी देण्याची मागणी केली.
न्यायालयाने राज्य पोलीस प्रमुखांना त्वरित या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, स्थानिक पोलीस अधीक्षकांच्या बेफिकीरीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. नूर मुस्तफा या पोलिस अधीक्षकांनी सदर गुन्हेगार शाहरुख हा मनोरुग्ण असल्याचे सांगत या प्रकरणाला वेगळे वळण दिल्याचा आरोप केला गेला. त्याचीही गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

न्यायालयाने अंकिताला वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात अक्षम्य कुचराई करण्यात आल्याचीही दखल घेतली. अंकिताला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याबद्दल प्रशासनाने ढिलाई दाखवली त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार

बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’

लालबागच्या राजाच्या दरबारी भाविक, सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी

अंकिता ही तिच्या घरी झोपली असताना आरोपी तिच्या घराच्या खिडकीजवळ पोहोचला आणि पेट्रोल शिंपडून त्याने आग लावली. यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर अंकिताला दुमका येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढे रांची येथील रुग्णालयातही पाठवण्यात आले. दरम्यान, अंकिताचा मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा