26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार

कोल्हापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू

Google News Follow

Related

विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा सध्या राज्यात पेटलेला असून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. याचं पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे.

याअंतर्गत बुधवार, १७ जुलै रोजी दुपारी दोन वाजल्यापासून कोणत्याही व्यक्तीला सोशल मीडिया साईट्स म्हणजेच इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक आदी मार्फत अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये या विषयाच्या अनुषंगाने समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शिवकालीन वाघनखे महाराष्ट्रात आली!

‘आसाममध्ये गंभीर प्रश्न, मुस्लिम लोकसंख्या १२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर’

महिला आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार; भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात

खेडकरांच्या बंगल्याबाहेरील अनधिकृत बांधकाम अखेर हटवलं !

किल्ले विशाळगड अनाधिकृत अतिक्रमणाबाबत अधिक तणाव निर्माण होऊन प्रकरणाला वेगळे वळण मिळू नये यासाठी कलम १६३ जारी करण्यात आलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी १४ जुलै रोजी गजापुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. तरुणांकडून नासधुस करण्यात आली होती. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत अचानक दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान केले होते. या सर्व घटनांचे व्हिडीओ, रिल्स, फोटो सोशल मीडियातून व्हायरल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ मधील तरतुदी आणि प्रचलित कायद्यान्वये फौजदारी कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा