किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षात पाच नेत्यांना धक्के देण्याचे संकेत दिले होते. यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यान्चाओह समावेश होता. किरीट सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पेडणेकर यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कारवाई पेडणेकर कुटुंब आणि त्यांच्या किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी खोटे बोलून, फॉड, फोर्जरी, चीटिंग आणि फसवणूकीने आपली आपल्या परिवाराची किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे रजिस्ट्रेशन केले व कोट्यावधी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. कंपनी मंत्रालय, रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे खोट्या सह्या करून रजिस्ट्रेशन मिळवले या संदर्भात त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश मुंबईतील स्पेशल कंपनी न्यायालय,अतिरिक्त सेशन्स न्यायालयाने दिले आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ४४८ च्या अंतर्गत ही कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. ए. ए. जोगळेकर यानी दिले असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
किशोरी पेडणेकर व त्यांच्या परिवाराने फसवणूक केली, खोटे कागदपत्र, खोटी माणसे उभी करून आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन व अन्य प्रक्रिया केली. अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी कंपनी मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर कंपनी मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात खटला दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणजे स्पेशल कंपनी न्यायालयाने आता या वर आपला निर्णय दिला आहे.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण
अजित पवार यांची वैचारिक उंची कळली
न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
स्पेशल केस ३१३/२०२१ च्या अंतर्गत किशोरी पेडणेकर यांचे सुपुत्र साईप्रसाद किशोर पेडणेकर आणि त्या कंपनीचे अन्य संचालक प्रशांत गवस, शैला गवस, गिरीश रेवणकर आणि किशोरी पेडणेकर यांनी स्थापन केलेली कंपनी किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. यांना आता ६ फेब्रुवारी २०२३ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.