दिवंगत अंमली पदार्थ तस्कर इक्बाल मेमन उर्फ मिर्ची विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन दशकांहून अधिक जुन्या पोलिस खटल्यांच्या फाईल्स सापडत नसल्याने ईडीची कार्यवाही रखडली आहे.
गँगस्टर इक्बाल मिर्ची हा कुख्यात गँगस्टर होता. तो दाऊद गँगसाठी ही काम करायचा. मिर्ची यांच्या विरोधात वीस ते तीस वर्षांपूर्वी अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. यामध्ये मारमारी, ड्रग्स तस्करी, खून खंडणी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांच्या आधारे ईडीने इक्बाल यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीला आपला गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपी विरोधात इतर यंत्रणेकडे गुन्हा दाखल असणं आवश्यक असत. तर, आरोपी मयत झाला असला तरी ईडी गुन्ह्याचा तपास करत असते.
त्यामुळे ईडीने मुंबई पोलिसांकडून इक्बाल विरोधातील कागदपत्रे मागवली आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी ईडीला पेपर सापडत नसल्याचे तोंडी कळविलेलं आहे. मात्र, अद्याप लिखित स्वरूपात कळवलेलं नाही. इक्बाल विरोधात ईडीची न्यायालयीन कारवाई सुरू असून इक्बाल विरोधात कोणत्या गुन्ह्याच्या आधारावर कारवाई केली हे ईडीला न्यायालयाला कळवायच आहे. मुंबई पोलिसांचा लिखित अभिप्राय महत्त्वाचा असणार आहे.
हे ही वाचा:
मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक झोनफ्रिलोंचे अकाली निधन; अनेकांना धक्का
नवा अध्यक्ष झाला तर काय अडचण आहे… अजित पवारांच्या भूमिकेमुळे सगळेच दचकले!
‘केरळ स्टोरी’तील १० प्रसंग कापले, चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट
भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये
ईडीसाठी मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे महत्त्वाचे आहेत मात्र, त्यावर मार्ग काढण्यासाठी ईडीने दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. ईडीने इक्बाल विरोधात २०१९ मध्ये गुन्हा नोंदवला होता. या तपासादरम्यान इक्बालचा साथीदार हुमायून मर्चंट याला अटक करण्यात आली होती. तामिळनाडू, चेन्नई येथे हुमायून विरोधात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात हुमायून याने बोगस के वाय सी चा २०११ सालात वापर करून आयडीबीआय बँकेत खाते उघडले होते. त्या द्वारे त्याने ६ कोटी ६० लाख रुपये इक्बाल मिर्ची याला हवाला केले होते. त्या गुन्ह्याचा वापर करून ईडी इक्बाल विरोधात मनी लॉन्डरिंगचा खटला चालवण्याची शक्यता आहे.