व्हेल माशाची ‘उलटी’ विकणारे तिघे जाळ्यात

व्हेल माशाची ‘उलटी’ विकणारे तिघे जाळ्यात

व्हेल माशांची (देव मासा) ‘उलटी’ विकण्यासाठी आलेल्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ च्या पथकाने अटक केली आहे. या तिघांजवळून पोलिसांनी अडीच किलो वजनाचा एक दगड जप्त केला असून हा दगड साधासुदा दगड नसून व्हेल माशांच्या पचनसंस्थेतून तयार झालेल्या ‘उलटी’ पासून तयार झालेला दगड असून त्याची बाजारात २ कोटी ७० लाख रुपये किंमत असल्याची माहिती कक्ष ४चे प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे यांनी दिली आहे. स्पर्म व्हेलच्या शरीरातूनच फक्त ही उलटी तयार होऊन बाहेर फेकली जाते.

शासनाकडून व्हेल माशांच्या या ‘उलटी’च्या (अँबरग्रीस) याच्या खरेदी विक्रीवर बंदी आणलेली असताना या अँबरग्रीसची विक्री बेकायदेशीररित्या केली जात आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात अँबरग्रीसची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ४च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कक्ष ४ च्या पथकाने मुलुंड पश्चिम पी. के.रोड येथील साल्पादेवी पाडा या ठिकाणी सापळा रचून तीन संशयितांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार

मालमत्ता कराला भाजपाचा कडाडून विरोध

शिक्षकांना लोकलची परवानगी; तरी मूल्यांकन लांबणार

वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आलेल्या तिघांजवळून लाल तपकिरी रंगाचा २ किलो ७००ग्राम वजनाचा दगड ताब्यात घेऊन तो तपासणीसाठी मरीन ‘बायोलॉजिस्ट’ विभागाकडे पाठवण्यात आला असता त्यांनी तपासून हा दगडासारखा हा पदार्थ व्हेल माशाची उलटी म्हणजे आँबेरग्रीस असल्याची खात्री करण्यात आली. तसेच या अँबेरग्रीसची किंमत २ कोटी ७० लाख रुपये असल्याची पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अँबरग्रीस हे स्पर्म व्हेल जातीच्या महाकाय माशांच्या शरीरातील पित्ताशयातून आतड्यांत सोडले जाते. ते बऱ्याचवेळा समुद्रात तरंगत राहते किंवा वाहात किनाऱ्यावर येते. काहीवेळा मृत्युमुखी पडलेल्या स्पर्म व्हेलच्या पोटातही ते सापडते. त्याला उलटी म्हटले जात असले तरी ते तोंडातून बाहेर येते का यासंदर्भात बरेच विवाद आहेत. याचा शोध १९४६मध्ये लागला. त्याचा वापर प्रामुख्याने सुगंधी द्रव्ये, अत्तरे बनविण्यासाठी होतो. तुर्किश कॉफीमध्येही स्वादासाठी त्याचा वापर होत असल्याचे उदाहरण आहे. १८-१९व्या शतकात व्हेल माशांची विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी शिकार लक्षात घेता त्यावर बंदी आणण्यात आली.

Exit mobile version