ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांसह पत्नीवर गुन्हा

जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांसह पत्नीवर गुन्हा

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रवींद्र वायकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच त्याजागी हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप रवींद्र वायकरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी रविंद्र वायकरांसह त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकरांसह त्यांची पत्नी आणि इतर अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लापवल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर, मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि अभियंता अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘ब्लू डार्ट’च्या सेवेचे नवे नाव; आता डार्ट प्लस नव्हे ‘भारत डार्ट’

व्यावसायिक हेमंत पारीख अपहरण प्रकरणी राजस्थानातील टोळीला अटक

इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम

हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड

प्रकरण काय

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात हा मुद्दा उठवला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार केली होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते.

Exit mobile version