धक्कादायक!! लहान मुलांवरील गुन्ह्यात दररोज होतेय वाढ

धक्कादायक!! लहान मुलांवरील गुन्ह्यात दररोज होतेय वाढ

राज्यामध्ये कोरोनाकाळात म्हणजेच २०२० मध्ये लहान मुलांविरुद्ध होणारे गुन्हे वाढले आहेत. भारतामध्ये दररोज सरासरी ३५० गुन्ह्यांची नोंद केली गेली होती. त्यामुळे या घटनेकडे पाहता हा अहवाल धक्कादायक आहे.

क्राय या संस्थेने नोंदवलेल्या अहवालातून हे विदारक चित्र समोर आलेले आहे. बाल अधिकार आणि आपण (CRY) या स्वयंसेवी संस्थेने केलेले हे विश्लेषण केले. लॉकडाऊन दरम्यान मुलांच्या संरक्षणाशी कशी तडजोड केली गेली हे आकडेवारीवरून दिसून आले आहे. देशभरामध्ये एक लाखांहून अधिक बालकांना अत्याचार सोसावे लागले आहेत.

मुख्य म्हणजे पॅक्सो अंतर्गत सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बालकांच्या अपहरणाच्या घटना फारच वेगाने वाढलेल्या आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रामध्ये बालकांचे अपहरण होण्याच्या एकूण ७,३९२ घटना घडल्या आहेत. यापैकी मुंबईमध्ये १,१४१, ठाणे-५८३, पुणे-४२३, पुणे ग्रामीण- ३३९, पिंपरी चिंचवड-३३९, मीरा भाईंदर- ३८०, नागपूर- ३१२, पिंपरी चिंचवड- २९०, नाशिक ग्रामीण- २२२ इतक्या घटना घडलेल्या आहेत.

 

हे ही वाचा:

आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर

नवरात्रीच्या निर्णयावरून महाविकास आघाडीत ‘गरबा’

‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर

भारताचा दोहा कराराला विरोध?

 

कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बालविवाहात ५० टक्के वाढ झाली आहे. तसेच एका वर्षात ऑनलाईन गैरवर्तनामध्येही वाढ झालेली आहे. महाराष्ट्रमध्ये ११.१ टक्के गुन्ह्याचे प्रमाण असून, १४९ बालकांची हत्याही करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये टाळेबंदीदरम्यान ५,६८७ बालकांवर लैंगिंक शोषणाचे गुन्हे घडले आहेत. तसेच मुलींवर लैंगिक अत्याचाराचा आकडा हा ५,५७० इतका आहे. घडलेल्या घटनांमध्ये ४४६ प्रकरणामध्ये विवाहासाठी अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आलेले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील ३,८६७ बालक बेपत्ता असल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. कोरोना निर्बंध आणि आर्थिक मंदीमुळे उपजीविकेवर खूपच परीणाम झाला. परीणामी, बालमजुरी, बालविवाह, बालकांसाठी मुलांची असुरक्षितता वाढवण्यास हातभार लागण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Exit mobile version