हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !

समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांकडून अटक

हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !

बिट्टू बजरंगी याने भगवा पोशाख परिधान करून धमकावणाऱ्या गाण्यासह एक व्हिडिओ क्लिप शेअर केला होता. यानंतर बिट्टू विरुद्ध १ ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.बिट्टू बजरंगीने जी क्लिप शेअर केली ती स्लो-मोशन मध्ये घेऊन त्यामध्ये साउंडट्रॅकसह , ‘गोली पे गोली चलेंगी, बाप तो बाप रहेगा’ अशाप्रकारचे गाण्याचे बोल असलेला एक व्हिडिओ शेअर केला.त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बिट्टू बजरंगीला अटक केली आहे.

३१ जुलै (सोमवार) रोजी, हरियाणातील नुह येथे विश्व हिंदू परिषदेने ‘ बृज मंडळ जलाभिषेक यात्रा ‘ काढली. या यात्रेला काही समाज कंटकांकडून रोखण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर दोन गटात हाणामारी होत याचे रूपांतर हिंसाचारात झाले. या दंगलीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर १ ऑगस्ट मंगळवार म्हणजे दुसऱ्या दिवशी बिट्टू बजरंगी याने एक व्हिडिओ क्लिप शेअर केला त्यात धमकावणारे बोल असलेले गीत होते. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एफआयआर नोंदवला.त्यानंतर पोलिसांनी आज त्याला अटक केली आहे.या प्रकरणी बिट्टू बजरंगीने इंडिया टुडेला मुलाखत दिली त्यात त्यांना या व्हिडिओ बाबत विचारले असता ते म्हणाले, ज्यांनी मला धमक्या दिल्या, त्यांना मी उत्तर दिले होते, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

तारीख ठरली!! विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सीन वॉर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

पंतप्रधान मोदींकडून ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा !

अमेरिकेचे विमान तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली; प्रवाशांची भीतीने गाळण

हरियाणात झालेल्या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला होता.तसेच गुरुग्राममध्ये जमावाने एका मुस्लिम धर्मगुरूची हत्या केली आणि दुकानांची तोडफोड करत रेस्टॉरंट्स जाळले. पलवल, मानेसर, फरीदाबाद आणि रेवाडी येथेही जाळपोळ झाल्याची नोंद आहे.प्रचलित परिस्थितीमुळे प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आणि इंटरनेट बंद करण्यात आले.हरियाणा सरकारच्या म्हणण्यानुसार हिंसाचाराच्या संदर्भात ११६ लोकांना अटक करण्यात आली आणि ९० जणांना ताब्यात घेण्यात आले.

Exit mobile version