कोरोनाच्या काळात आपल्या पत्नीचे दागिने विकून रिक्षाचे रुग्णवाहिकेत रूपांतर केल्याबद्दल तमाम मीडियाने डोक्यावर घेतलेल्या जावेद खान या भोपाळमधील युवकावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
जावेद खानने आपल्या शेजारी राहात असलेल्या एका महिलेशी मैत्री केली आणि नंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण तिने लग्नाची मागणी केल्यावर मात्र त्याने नकार दिला. तेव्हा तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या हा जावेद खान फरार आहे.
पण यानिमित्ताने एक वेगळी बाजू समोर आली आहे ती म्हणजे याच जावेद खानची स्तुती करताना काही काळापूर्वी माध्यमे थकत नव्हती. जवळपास सगळ्या माध्यमांनी त्याने आपली ऑटोरिक्षा कशी बायकोचे दागिने गहाण ठेवून रुग्णवाहिकेत रूपांतरित केली, जवळपास १५ लोकांचे जीव त्याने कसे वाचविले, आंतरराष्ट्रीय संघटनांनी त्याच्या या कार्याची दखल घेतली. विशेषतः डाव्या, पुरोगामी संघटना व व्यक्तींकडून त्याच्यावर स्तुतीसुमनांचा पाऊस पाडण्यात येत होता. त्याचवेळी महाराष्ट्रात ८५ वर्षीय वयाचे नारायण दाभाडकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या वयोवृद्धाची मात्र टिंगल उडविण्यात आली. त्यात हीच माध्यमे अग्रेसर होती.
हे ही वाचा:
राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत!
एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा
ठाकूर संकुलाला अपुरा पाणीपुरवठा; पालिका अधिकाऱ्यांना रहिवाशांनी घेतले फैलावर
कोरोनाच्या काळात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनची पातळी घसरल्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती, पण रुग्णालयात जागा शिल्लक नव्हत्या. अखेर त्यांच्या मुलीने त्यांना कशीबशी जागा मिळविली. त्यावेळी रुग्णालयात आलेल्या एका महिलेला तिच्या नवऱ्यासाठी बेड हवा होता. तेव्हा दाभाडकर यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगून आपला बेड त्यांना उपलब्ध करण्याची विनंती केली. आपण ८५ वर्षांचे आहोत, मी माझे जीवन पूर्ण जगलो आहे, तेव्हा हा बेड या गरजू कुटुंबाला द्या, असे त्यांनी म्हटले होते. पण दाभाडकर यांची ही कहाणी ऐकल्यानंतर मात्र याच माध्यमांना त्यावर जराही विश्वास बसला नाही. त्यांनी त्यात काही काळेबेरे आहे का पाहण्यासाठी आटापीटा सुरू केला.
दाभाडकर यांच्या मुलीने नंतर एक व्हीडिओ जारी करत नेमकी परिस्थिती काय होती, हे स्पष्ट केले होते.