26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादेशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

प्रयागराजमधील न्यायालयात आणले जाणार, त्याचा भाऊ अशरफही आरोपी. एकूण ११ आरोपींचे भवितव्य ठरणार

Google News Follow

Related

गुजरातमधून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणण्यात आलेला नामचीन गुंड अतीक अहमद याला आज शिक्षा सुनावली जाणार का, याची उत्सुकता देशभरात आहे. १७ वर्षांपूर्वी तत्कालिन आमदार राजू पाल याची हत्या आणि त्यानंतर त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार उमेश पाल याच्या अपहरण आणि हत्येसंदर्भात प्रयागराजमधील एणपी एमएलए न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार आहे. उमेश पाल यांच्या नातेवाईकांनी अतीकला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. उमेश पाल अपहरण प्रकरणात अतीकला कोणती शिक्षा सुनावणार हे निश्चित होणार आहे.

या प्रकरणात अतीक अहमदसह त्याचा भाऊ अशरफ आणि ११ जण आरोपी आहेत. सोमवारी अतीक अहमदला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून इथे आणण्यात आले. तर अशरफला बरेलीहून प्रयागराजला आणले गेले. त्यांना तुरुंगात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. नैनी तुरुंगातून त्यांना न्यायालयात आणले जाईल.

हे ही वाचा:

मोपला दंगलीवर चित्रपट बनवणारे अली अकबर यांची न्यूज डंकाला भेट

उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात ‘कांदे’ पाणी आणतील!

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना सुका दम

राम सेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा!

२५ जानेवारी २००५मधअये बसपाचे आमदार राजू पाल यांची हत्या करण्यात आली होती. २८ फेब्रुवारी २००६मध्ये या हत्याकांडातील प्रत्यक्ष साक्षीदार उमेश पाल याचे अपहरण करण्यात आले. ५ जुलै २००७मध्ये अतीक व त्याच्या भावावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर्षी २४ फेब्रुवारी २०२३ला उमेश पालची हत्या करण्यात आली. अंदाधुद गोळीबार करत त्याला मारण्यात आले. त्याची चर्चा देशभरात सुरू होती. याच प्रकरणात आज सुनावणी होईल आणि कदाचित अतीकला शिक्षा सुनावली जाईल. त्यासाठीच त्याला गुजरातहून आणण्यात आले. तेव्हा त्याचे एन्काऊंटर होईल, अशा अफवा पसरल्या होत्या.

या सगळ्या प्रकरणानंतर अतीक अहमदची सगळी हडप केलेली संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याच्या सगळ्या कुटुंबावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात दंडेलशाही करून जमिनी हडप केलेल्या आहेत. त्या सगळ्या आता जप्त करण्यात आल्या आहेत. ७५१ कोटी इतकी किंमत त्याने हडप केलेल्या जमिनींची आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा