24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाभोंदू बाबा, आश्रम यावरील याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

भोंदू बाबा, आश्रम यावरील याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाने तथाकथित बाबा आणि आश्रम यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनवाई घेण्यास नकार दिला आहे. यावेळेला हे न्यायालयाच्या क्षेत्रात येत नसल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठीने याचिकाकर्त्यांच्या वरिष्ठ वकिल मेनका गुरूस्वामी यांना न्यायालयाने भोंदू बाबा नेमके कसे ठरवावेत असा प्रश्न उपस्थित केला. 

याचिकाकर्ते डुंपाला रामरेड्डी यांच्यातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ मेनका गुरूस्वामी यांनी याचिका मागे घेण्याची केलेली मागणी मान्य केली आहे. त्यामुळे ही याचिका रद्दबादल ठरवण्यात येत असल्याचे न्यायमुर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमुर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी निकालात स्पष्ट केले. 

थोडक्यात झालेल्या सुनावणीत वकिलांनी ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ने भोंदू बाबांची यादी तयार केला असल्याचा उल्लेख केला.

त्यावर खंडपीठाने या यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खंडपीठाच्या मते, या यादीवर विश्वास कसा ठेवावा? ही यादी, त्यात समाविष्ट केलेल्यांची बाजू ऐकून मग बनवली आहे का याबाबत अनभिज्ञ आहोत? त्याला प्रत्युत्तर देताना विधीज्ञ गुरुस्वामी यांनी सांगितले की या यादीत कोर्टाने दोषी ठरवलेला राम रहिम सिंग यांचादेखील उल्लेख आहे,

कोर्टाने या यादीबद्दल बोलताना सांगितले की, आम्हाला कोणाचाही अथवा अखिल भारतीय आखाडा परिषदेचा अवमान करायचा नाही, मात्र आखाडा परिषदेने नेमक्या कोणत्या निकषांवर ही यादी बनवली? परिषदेचा यात समाविष्ट केलेल्या लोकांबद्दल काय दृष्टीकोन आहे? यादी कशी बनवली गेली हे माहित नसताना, सर्वोच्च न्यायालय त्याच्या अख्त्यारीत न येणाऱ्या बाबींवर निर्णयय घेऊ शकत नाही असे स्पष्ट केले. 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कथित बाबाने बेकायदेशीरपणे बंधक बनवलेल्या आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी हिबीय कॉर्पस याचिका दाखल केली आहे. 

मागील वर्षी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलना या याचिकेनुसार देशभरात कथित बाबांच्या विरोध केल्या जाणाऱ्या कारवायांत आणि अध्यात्मिक विद्यालयातील अमानवी वातावरणांतून स्त्रीयांची करण्यात येणाऱ्या सुटकेत लक्ष घालावे असे सांगितले होते. 

डुंपाला रामरेड्डी यांनी त्यांच्या याचिकेत, त्यांची परदेशातून उच्चविद्याविभूषित असलेली मुलगी जुलै २०१५ पासून बलात्काराचा आरोप असलेल्याने स्थापन केलेल्या अध्यात्मिक विद्यालयात हलाखीचे जीवन व्यतीत करत असल्याचे नमूद केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा