सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने वाझे यांना २५ मार्च पर्यंतची एनआयए कोठडी दिली आहे. न्यायमूर्ती शिंकरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आली.

शनिवारी अटक झाल्यानंतर रविवारी दुपारी वाझेंना विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्या आधी वाझे याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या ‘हॉलिडे कोर्ट’ मध्ये न्यायमूर्ती शिंकरे यांच्या न्यायालयात वाझे यांना हजर करण्यात आले. यावेळी एनआयए कडून वाझे यांच्या १४ दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली. प्रकरणात अजून तपास करण्यासाठी आणि वाझे यांची चौकशी कारण्यासाठी कोठडी मिळावी अशी मागणी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात आली होती. या मागणीवर निकाल देताना ‘हॉलिडे कोर्ट’ कडून वाझे यांना अकरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे सोबत काही सौदा ठरला होता का? – आमदार अतुल भातखळकर

अर्णबला अटक करताना वाझेंनी वापरली होती ‘तीच’ स्कॉर्पिओ

‘त्या’ इनोव्हा गाडीचे वाझे कनेक्शन

वाझे प्रकरणातील ते शिवसेना नेते कोण?

या अकरा दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून सचिन वाझे यांची आणखी चौकशी केली जाऊ शकते. यासोबतच वाझे यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते. सचिन वाझे यांना अंबानी स्फोटक प्रकरणात अटक झाल्यानंतर या विषयात अनेक खळबळजनक गोष्टी पुढे येत आहेत. अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ आणि अर्णब गोस्वामीला अटक करताना वापरलेली स्कॉर्पिओ एकच होती, स्कॉर्पिओ सोबत पाहिली गेलेली पांढरी इनोव्हा ही मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकाच्या नियमित वापरतील गाडी होती. अशा अनेक खळबळजनक गोष्टी पुढे येत आहेत. त्यासोबतच या प्रकरणात काही शिवसेना नेते सहभागी असल्याचे वाझे यांनी म्हटल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. त्यामुळे पुढील अकरा दिवसांत वाझे यांच्या चौकशीतून आणखीन काय गौप्यस्फोट होणार, कोणाकोणाची नावे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकरा दिवसांनंतर वाझे यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी एनआयएला आवश्यक वाटल्यास त्यांच्याकडून पुन्हा एकदा कोठडीचा कालावधी वाढवून देण्याची मागणी कोर्टाकडे केली जाऊ शकते.

Exit mobile version