कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी

कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी

भारताचा दिग्गज टेनिस स्टार लिएंडर पेसला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने कौटुंबिक हिंसाचारात दोषी ठरवले आहे. पेसवर २०१४ साली त्याची मैत्रीण आणि लिव्ह-इन पार्टनर रिया पिल्लईने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यावरून पेसला गुन्हगार ठरवले आहे. यासोबतच कोर्टाने पेसला दर महिन्याला घराचे भाडे रियाला पाठवण्यास सांगितले आहे. टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर पेसने गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पेस हा अभिनेत्री आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत बरेच दिवस नात्यामध्ये होता. दोघेही जवळपास आठ वर्षे लिव्ह इनमध्ये होते. यादरम्यान दोघांना एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी अकिरा ठेवले. २०१४ मध्ये रियाने पेसवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि कोर्टात केस दाखल करून पोटगीची मागणी केली होती.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण

युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ

युक्रेनहून येणारे भारतीय ९ वाजता येणार भारतात

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण

न्यायदंडाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात हा निकाल दिला पण त्याची माहिती माध्यमांना आज देण्यात आली आहे. कोर्टाने हे मान्य केले आहे की, पेसने त्याच्या कृत्याची कबुली दिली आहे. त्याने रियावर भावनिक, आर्थिक आणि शाब्दिक अत्याचार केले आहेत. रिया पिल्लईने तिच्या आणि लिएंडर पेससोबत खरेदी केलेल्या घराच्या विभाजनाची मागणी केली होती. ही मागणी फेटाळत न्यायालयाने रियाला ते घर सोडण्यास सांगितले आहे. लिएंडरला आदेश दिला की, रियाला दरमहा दीड लाख रुपये द्यावे लागतील. त्यापैकी ५० हजार घरभाडे आणि एक लाख रुपये देखभालीसाठी असतील, ही पोटगी मार्चपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर ही रक्कम दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढणार आहे.

Exit mobile version