…त्यांनी ‘भरोसा’ दिला; कुवेतमध्ये बंदिस्त जोडप्याला सोडवले

…त्यांनी ‘भरोसा’ दिला; कुवेतमध्ये बंदिस्त जोडप्याला सोडवले

परदेशात जाऊन चांगले पैसे कमविण्याचे स्वप्न उराशी ठेवून कुवैत येथे गेलेल्या एका जोडप्याचे त्यांच्या मालकाने शोषण करून त्यांना घरातच बंदिस्त केले होते, मात्र मीरा भायंदर वसई विरार पोलिसांचा ‘भरोसा सेल’ त्यांच्या मदतीला धावून आले व या जोडप्याची मालकाच्या तावडीतून सुटका करून त्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात भरोसा सेलला यश आले.

ठाणे जिल्ह्यातील भायंदर येथे राहणारे एक जोडपे पैसे कमाविण्याच्या उद्देशाने एप्रिल महिन्यात एका एजन्सी मार्फत कुवैतला गेले होते. कुवेतच्या एका नागरिकाने त्यांना घरगुती मदतनीस म्हणून कामावर ठेवले होते. त्यांना मासिक पगार ४० हजार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांनी घरकाम आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त दोन मुलांची काळजी घेतली पाहिजे होती, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांचा मालक मोसाब अब्दुल्ला यांनी या जोडप्याला नऊ मुलांची काळजी घेण्यास भाग पाडले आणि त्यांच्यासोबत सहा खोल्याचा एका फ्लॅटची साफसफाई करून घरातील इतर काम करण्यास भाग पाडले, हे जोडपे दिवसातून २२ तास काम करीत होते, कामाच्या ताणामुळे महिला आजारी पडली आणि तिला कुवेतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने रुग्णालयातून कसेबसे भायंदर मधील एका महिलेला तिची व्यथा सांगितली आणि तिची मदत करण्यास सांगत तिला तेथील लोकेशन पाठवले.

हे ही वाचा:

वीर सावरकरांची शौर्यगाथा सांगणारे संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारणार!

जपानच्या माजी पंतप्रधान शिंजो आबेंच्या मृत्यूनंतर, राष्ट्राध्यक्षांच्या हत्या पुन्हा चर्चेत

मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्यांचे सरकार! ताफ्याच्या प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

बीकेसीजवळच्या एका झोपडीत सापडला नागोबा!

 

आजारी महिलेने लोकेशन ट्विट केल्याची माहिती कळताच मालकाने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला आणि तिच्या पतीला घराबाहेर पडू दिले नाही. भायंदर येथील महिलेने तिला पुन्हा संपर्क करण्याचा पर्यत केला मात्र तिचा संपर्क होऊ न शकल्याने काहीतरी गडबड असल्याची शंका येताच या महिलेने मीरा भायंदर वसई विरार पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी यांनी कुवैत येथील भारतीय दूतावासाची मदत घेतली. भारतीय दूतावासाने या महिलेची माहिती काढून तिला भारतीय दूतावासात आणून तिची आणि तिच्या पतीची मालकाच्या तावडीतून सुटका करून दोघांना भारतात सुखरूप पाठवले.

Exit mobile version