24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादेशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड

देशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड

बोगस कागदपत्रांच्या आधारे लाखो सिम कार्डची विक्री, १३ जणांना अटक

Google News Follow

Related

देशातील सर्वात मोठा मोबाईल सिम कार्ड घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी याप्रकरणी १३ जणांना अटक केली असून ८,५०० सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. दरम्यान या आधारे मुंबईसह वसई नालासोपारा या दोन ठिकाणी बेकायदेशीर सुरू असणाऱ्या कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांनी छापेमारी करून ६ लॅपटॉप, ५२ मोबाईल फोन जप्त केले आहे.

बोगस कागदपत्राच्या आधारावर घेण्यात आलेले सिम कार्डचा वापर देशात गुन्हेगारी कृत्यासाठी केला जात असल्याची माहिती मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर सह राज्यभरात बोगस कागदपत्रे तयार करून त्या बोगस कागदपत्राच्या आधारे विविध मोबाईल सिम कंपन्यांच्या कार्डची मोठ्या प्रमाणात विक्री करून बोगस कागदपत्राच्या आधारे विक्री करण्यात आलेले सिम कार्ड गुन्हेगारी, तसेच सायबर फसवणूक, बोगस कॉल सेंटर यांना विक्री करणाऱ्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती.

या रॅकेटमध्ये मुंबई सह उपनगरात विविध कंपन्यांचे सिम कार्ड विक्रीचे दुकान थाटून बसलेले विक्रेते सामील असून एकट्या अंधेरी सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध कंपनीचे १३८५ सिम कार्ड बोगस कागदपत्राच्या ऍक्टिव्ह करण्यात आल्याची माहिती दूरसंचार विभागाने मुंबई पोलिसांना दिली. या आधारे मुंबई पोलिसांनी मुंबईसह उपनगरातून बोगस कागदपत्रांच्या आधारावर मोबाईल सिम कार्ड विक्री करणाऱ्या १३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीनी आता पर्यत ८५००सिम कार्ड बोगस कागदपत्राच्या आधारे विकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी बोगस सिम कार्डच्या आधारे नालासोपारा आणि मुंबईत दोन कॉल सेंटर वर छापेमारी केली आहे. या कॉल सेंटरला बोगस सिम कार्डची विक्री करण्यात आली होती, व त्या सिम कार्डच्या आधारे कॉल सेंटर मधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत होती अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

आपल्या नावाने केल्या जाणाऱ्या बनावट जाहिरातींविरोधात सचिनची तक्रार

मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड

‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, काँग्रेस आघाडीवर

मुंबईसह देशभरात बोगस कागदपत्राच्या सिम कार्ड विक्रीचा बेकायदेशीर धंदा सुरू असून एकाच व्यक्तीचे छायाचित्र लावून तसेच बोगस कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड विक्री केली जात आहे, हे सिम कार्ड गुन्हेगारी कृत्य करणारे, सायबर गुन्हेगाराना त्याची विक्री केली जात होती अशी माहिती मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून त्या अनुषंगाने तपास केला जात असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा