वानखेडे प्रकरणातला निर्णय कळलाच नाही म्हणत मलिक गेले न्यायालयात

वानखेडे प्रकरणातला निर्णय कळलाच नाही म्हणत मलिक गेले न्यायालयात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय नवाब मलिक यांना कळलाच नाही. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय न समजण्यासारखा आहे, असे म्हणत नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडे प्रकरणात हायकोर्टातून आलेल्या निर्णयाला अनुसरून एक अर्ज एस. जे. काथावला यांच्या खंडपीठासमोर सादर केला आहे. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर झालेला निर्णय मान्य नसून पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

माधव जामदार यांनी दिलेला निर्णय हा कोणाच्याही एका बाजूने दिलेला नाही ना वानखेडे कुटुंबियांच्या ना मलिकांच्या म्हणून पुन्हा सुनावणीची मागणी मलिक यांनी केली आहे.

 

हे ही वाचा:

मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार?

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच

२६/११ हल्ल्यातील जखमींना वाचवणाऱ्या कामा रुग्णालयातील परिचारिकांवर लघुपट

 

ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवर माधव जामदार यांनी निर्णय देत नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियाविरोधात ट्विट न करण्याचा काल निर्णय दिला तर त्याआधी जे ट्विट कराल ते पडताळून करा असा मलिकांना सल्ला दिला होता. मलिक यांच्या वकिलांनी असे कोणतेही ट्विट अथवा भाष्य कोणत्याही व्यासपीठावरून करणार नाही, अशी हमी दिली होती.

न्यायाधीश माधव जामदार यांचे खंडपीठ बदलून दुसऱ्या खंडपीठासमोर नव्याने सुनावणी व्हावी, अशी मलिकांनी मागणी केलीय. सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.

Exit mobile version