कोरोना महामारी हे जगावर आलेले एक महामारीचे संकट आहे. या संकटातून सावरण्यासाठी आता लसीकरण हा एक पर्याय आपल्याकडे आलेला आहे. परंतु महाराष्ट्रात या संकटकाळातही लाचखोरीला उधाण आले होते. एकीकडे माणसे जीवानिशी मरत होती, तर दुसरीकडे लाचखोरी जोरात सुरू होती. कोरोनाकाळात लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये २० ते ६०० टक्के वाढ झालेली होती. गेल्या नऊ महिन्यात लाचखोरीविरोधात ५७७ गुन्हे दाखल झाले. यामधील तब्बल ३८९ म्हणजेच ६७.४१ टक्के गुन्हे हे टाळेबंदीच्या काळातील आहेत.
एकीकडे माणसे कोरोनाशी लढत होती, तर दुसरीकडे टेबलाखालुन खिसे गरम होत होते. जानेवारी ते सप्टेंबर या काळामध्ये राज्यामध्ये लाचखोरीचे ५७७ गुन्हे दाखल झाले. पुण्यातील महसूल विभाग लाचखोरीसाठी आघाडीत होता.
राज्यभरातील लाचखोरांची संख्या पहिल्या लाटेनंतर लगोलग वाढली. पहिल्या लाटेमध्ये बहुसंख्य कार्यालये बंद असल्यामुळे, लाचखोरीला लगाम लागला होता. परंतु नंतर कार्यालये उघडल्यावर अगदी राजरोसपणे लाचखोरीला सुरुवात झाली. दरवर्षी पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या सर्वाधिक कारवाया केल्या जातात. त्यातही महसूल विभाग आणि पोलीस दलातले अधिकारी आणि कर्मचारी लाच मागण्यात आणि स्वीकारण्यात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
एनसीबीकडून लाचखोरीत अटक केलेल्यांचं प्रमाणही या दोन्ही विभागात जास्त आहे. पुण्यातील महसुल विभाग हा कमविण्यासाठी उत्तम ठिकाण असल्यामुळे या विभागाकडे अनेकांचे लक्ष असते. परंतु सध्याच्या घडीला नेहमीपेक्षा जास्त लाचखोरी टाळेबंदीमध्ये झाल्याचे आता समोर आलेले आहे.
हे ही वाचा:
त्या रेव्ह पार्टीमध्ये होता एका बड्या नेत्याचा मुलगा?
गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल
आर्यन खानसह आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
यंदाही सर्वाधिक सापळे हे महसूल विभाग पोलीस विभाग आणि त्यानंतर महापालिकेत करण्यात आले आहेत. पुणे विभागात येणाऱ्या महापालिकांमध्ये लावण्यात आलेल्या ५ सापळ्यांमध्ये १२ जणांना अटक करण्यात आलं आहे.