ठाणे, नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागात क्रेनवर भ्रष्टाचाराचे ओझे

ठाणे, नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागात क्रेनवर भ्रष्टाचाराचे ओझे

ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक नियंत्रण विभागात आता एक नवीन धक्कादायक खुलासा झालेला आहे. लाखो रुपयांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. हा भ्रष्टाचार घोटाळा उघडकीस आणणारे इतर कोणी नसून, पोलीस दलातील जमादार आहेत. जमादार विजय टोके यांनी या भ्रष्टाचाराची लेखी तक्रार आयुक्तांकडे केलेली आहे. तसेच थेट मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री तसेच ठाणे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली आहे. मुख्य म्हणजे तक्रार करताना आपल्याला एका पोलिसानेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोपही टोके यांनी केला आहे.

सध्याच्या घडीला टोके यांनी केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. ठाण्यामध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून ठाणे वाहतूक शाखेत क्रेनचा भ्रष्टाचार सुरु आहे, असा थेट आरोप टोके यांनी केलेला आहे. एमएच वगळता ठाणे पोलिसांकडून नागालँड, कर्नाटक आणि गोवा येथून येणाऱ्या वाहनांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते, असाही आरोप टोके यांनी यावेळी केला.

टोके यांनी केलेला व्हिडीओ हा सध्याच्या घडीला चांगलाच गाजत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच त्यांनी आपले नाव सांगून मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्षात नोकरीवर असल्याचे म्हटले आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक क्रेनमधील भ्रष्टाचाराची माहिती दिल्याचे त्यांनी या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

हे ही वाचा:

… म्हणून त्यांनी चोरल्या सव्वादहा लाखांच्या बाईक!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ठाकरे सरकार, बोल बच्चन सरकार

पाकिस्तानमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी मालिकाच रद्द

क्रेनवर भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून ठाण्यातील नारपोलीतील पोलीस नाईक विजय सोने, काटे, मुंब्रा येथील चव्हाण आणि कळव्याचे भोईर, कापूरबावडी येथील शाम पाटील यांनी आपल्याला ठाण्यात येण्याचे आव्हान केले आहे. ‘तू ठाण्यात येऊन दाखव, तू मुंबईला परत जिवंत जाणार नाही, अशी धमकीच सोने यांनी दिल्याचा आरोपही या व्हिडिओमध्ये टोके यांनी केला आहे.

Exit mobile version