सासरच्या मंडळींकडून लग्नात दिलेले स्रीधन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बोरीवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कालेकर सह तीन अधिकारी यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिला व्यवसायाने वकील आहे, त्यांनी २०२१ मध्ये पती आणि सासरच्या मंडळी विरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात हुंडा कायदा, तसेच विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
अरविंद केजरीवालांना मोठा झटका, १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश!
सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे ‘सायबर कमांडो’
शरद पवार गटाला मिळाले नवे नाव… नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
या गुन्ह्यात तक्रारदार यांनी तीचे २७ लाख रुपयांचे स्त्री धन तीला परत मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद घाग यांना सांगितले होते. त्यांनी या गुन्हयातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नाली मांडे यांच्याकडे जाण्यास सांगितले, मांडे यांनी स्त्री धन मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच तक्रारदार महिलेकडे मागितली, त्यापैकी २ लाख २५ हजार रुपये तक्रारदार यांनी दिले असल्याचे तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, व उर्वरित ३ लाख रुपया साठी तगादा लावला असे विशेष सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तक्रारदार यांनी आरोप केला आहे.
न्यायालयाने प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला गुन्हा दाखल करण्याचे २ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले. न्यायालयाच्या आदेशावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन वपोनि. सुधीर कालेकर,पोनि.अरविंद घाग आणि पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली मांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.