आर्थर रोड तुरुंगातील २७ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग

आर्थर रोड तुरुंगातील २७ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून विविध ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला आहे. आता तुरुंगातही कैद्यांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे.

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. मागील काही दिवसात २७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून या कैद्यांना भायखळा येथील एका मनपा शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.

वायचळ यांच्या म्हणण्यानुसार बाहेरून येणारे नवीन कैदी आणि न्यायबंदी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आर्थर रोड तुरुंगात असलेल्या जुन्या कैद्यांमध्ये केवळ ४ कैद्यांना कोरोनाची लागण झालेली असून इतर रुग्ण कैदी हे बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांना भायखळा येथील मनपाच्या शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती वायचळ यांनी दिली.

तुरुंगातील कैद्यांची पूर्णपणे काळजी घेतली जात असून अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या कैद्यांना तुरुंगातील एका बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत असल्याचे वायचळ यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

मोलनुपिरावीर उपयुक्त की धोकादायक?

यूपीएससीमध्ये मीरारोडच्या भावना यादवने केली कमाल!

शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?

 

राज्यात आता नव्या ओमिक्रॉन व्हेरियन्टच्या प्रादुर्भावामुळे नवी नियमावली आखण्यात आली असून त्यानुसार अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात रेस्तराँ, हॉटेल्स, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लग्नसोहळे यावर निर्बंध घातले गेले आहेत. शाळा कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दोन लसी घेतलेल्यांनाच गर्दीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येत आहे.

Exit mobile version