‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’

‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’

ज्या क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि ड्रग्स जप्त केले तसेच ८ जणांना ताब्यात घेतले. त्या कॉर्डेलिया क्रूझचा या प्रकरणाशी थेट काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण क्रूझच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.

वॉटर वेज लेजर टूरिझम प्रा. लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युर्गन बेलोम यांनी म्हटले आहे की, मला हे स्पष्ट करावेसे वाटते की, कॉर्डेलिया क्रूझचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे या घटनेशी कोणताही संबंध नाही. कॉर्डेलिया ही क्रूझ दिल्लीस्थित मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती.

कॉर्डेलियातून प्रवास करणाऱ्या कुटुंबाना उत्तम दर्जाची व्यवस्था पुरविणे आणि त्यांचे मनोरंजन करणे हे आमचे कर्तव्य आहे. कॉर्डेलियाची जी संस्कृती आहे तिच्याशी मेळ खाणारी ही घटना अजिबात नाही. त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो आणि येत्या भविष्यात आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमांसाठी क्रूझचा वापर करण्यास अजिबात परवानगी देणार नाही. अर्थात, आम्ही संबंधित तपास यंत्रणांना सर्वप्रकारचे सहकार्य करू.

 

हे ही वाचा:

…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

निविदा मंजूर होण्याआधीच कंत्राटदाराने घेतले खड्डे बुजवायला!

राणीच्या बागेतील पेंग्विन टकाटक; ३० कासवे, १४ प्राणी मात्र दगावले

न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट

 

शनिवारी रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारून ८ जणांना ताब्यात घेतले. तिथे ड्रग्सही जप्त करण्यात आले. या क्रूझवर रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची खबर एनसीबीला लागली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यात प्रख्यात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version