नूंह येथील बोर्डाच्या परीक्षेत कॉपी; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा छापा

नूंह येथील बोर्डाच्या परीक्षेत कॉपी; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा छापा

हरयाणातील नूंह येथे बोर्डाच्या परीक्षेत कॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोर्डाच्या पथकाने छापा टाकला असता कॉपीच्या ३३ प्रकरणांची नोंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी तपास केला असता, परीक्षा केंद्र १५ व १६ मधून तरुणांना कॉपी करताना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातील फोनमधून प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र मिळाले आहे.

प्रश्नपत्रिकेतील क्यूआर कोड आणि हिडन फिचर्सला डीकोड केले असता, ही प्रश्नपत्रिका पिनगवा येथील निक्की मॉडल पब्लिक स्कूलमधून व्हायरल झाल्याचे आढळून आले आहे. या शाळेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका वितरित करण्याआधीच त्याचे छायाचित्र काढून ते व्हायरल केले होते. या सर्व प्रकारामुळे या केंद्रांवरील इंग्रजीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

जागतिक महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून मोठी भेट; सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात

मोहम्मद शमी उतरणार निवडणुकीच्या मैदानात?

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

संबंधित परीक्षार्थी आणि या केंद्रांवर परीक्षा ड्यूटीवर असणारे प्रमुख केंद्र अधीक्षक, केंद्र अधीक्षक, संबंधित पर्यवेक्षक, लिपिक आणि अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केंद्रांवर ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ ड्युटीवरून निलंबित करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. नूंहमधील विवध परीक्षा केंद्रांमधून कॉपी करणाऱ्या ४८ जणांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती हरयाणा विद्यालय शिक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉ. वीपी यादव यांनी दिली. कॉपी करणारे परीक्षार्थी आणि त्यांना प्रश्नपत्रिका पुरवणारे शिक्षक व कर्मचारी या सर्वांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.

Exit mobile version