मुस्लिम मुलांची ट्युशन घेणाऱ्या मुलीलाच केले मुस्लिम; उल्हासनगरात धक्कादायक प्रकार

पालकांच्या तक्रारीनंतर दोन जणांना अटक, आठ जण फरार

मुस्लिम मुलांची ट्युशन घेणाऱ्या मुलीलाच केले मुस्लिम; उल्हासनगरात धक्कादायक प्रकार

कल्याणजवळील उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उल्हासनगरमधील गणेशनगर येथील एका हिंदू मुलीचे नियोजनबद्ध धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. फिर्यादींच्या मते, त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती. परंतु, ती आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत काहीच माहिती देत नव्हते. अखेर मुलीच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य जाणून दोघांना अटक केली आहे. तर, आठ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

माहितीनुसार, फिर्यादी हे उल्हासनगर कॅम्प ४ मधील समता नगर येथील गणेशनगर चाळीत कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी दृष्टी ही विज्ञान शाखेत बारावी झाली आहे. ती शेजारी राहणाऱ्या शेख कुटुंबियांच्या मुलांची ट्युशन घ्यायची. त्यामुळे शेख परिवाराचे फिर्यादी यांच्या घरी येणे जाणे होत होते. या कालावधीत शेख कुटुंबियांनी दृष्टी हिला नमाज पठण करायला लावले, तसेच रोजा धरण्यास सांगितला. तिला इस्लामनुसार वागायला लावले. दरम्यान ती मुलगी युट्युबवरील जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायची. शेख कुटुंबियांनी त्यांच्या मुलीसमवेत दृष्टी हिची बुरखा घातलेली छायाचित्रे संकेतस्थळावरून प्रसारित केली. शेजारच्या एका बाईने दाखवला होता. त्यावर मुलीला बुरखा घातलेल्या फोटोबाबत विचारणा केली, त्यावर तिने सहजच तो फोटो काढलेला आहे, असं सांगत मुलीने विषय उडवून लावला होता. शिवाय उल्हासनगर येथील मदरशामध्ये दृष्टीचे धर्मांतर करण्यात आल्याची कागदपत्रे तयार करण्यात आली. याविषयी दृष्टी हिची आई कल्पना चौधरी यांनी वेळोवेळी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

दृष्टी हिची आई कल्पना चौधरी यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दृष्टी हिच्यासह पोलिसांनी १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आठ आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा..

श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन उपक्रमाची उद्यापासून सुरुवात

आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार दिल्लीत !

मध्य प्रदेशात मंदिरालगतची भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू

नारायणपूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ आयईडी बॉम्ब जप्त !

Exit mobile version