राज्यात सध्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर हिचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी रोज नव्याने खुलासे येत असून आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या आई वडिलांच्या अडचणीत वाढ होत आहे. अशातच पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांचा गावकऱ्यांना धमकावतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या हातात पिस्तुल दिसून येत होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मनोरमा खेडकर यांचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर यांच्या शोधात पोलीस होते. अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना आता पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर या हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या.
पुणे पोलिसांची तीन पथके मनोरमा यांचा शोध घेत होती. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद होता. त्यानंतर पोलिसांची तीन पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते. गुरुवारी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे. खेडकरांच्या घराबाहेर नोटीस देखील लावण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हे ही वाचा:
दुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला ‘तीन तलाक’ !
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार
हरियाणात अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण, बिनव्याजी कर्जही मिळणार !
अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने ठेवला राखून
प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे काही वाद होते आणि या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते. वर्षभरापूर्वीच्या या प्रकाराचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.