23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुलांना 'गायब' करणाऱ्या शाळेच्या बस काँन्ट्रॅक्टरचे कंत्राट रद्द

मुलांना ‘गायब’ करणाऱ्या शाळेच्या बस काँन्ट्रॅक्टरचे कंत्राट रद्द

Google News Follow

Related

सांताक्रूझ येथील पोद्दार हायस्कूलच्या बसचे प्रकरण चर्चेचा विषय बनलेले असताना आता त्या बसच्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. मुलांसाठी बस पुरविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टच रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर येते आहे.

या शाळेची बस साडेचार तास गायब असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी १२.३० ते ४.३० या वेळेत ही बस गायब होती. तिचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर ती बस शाळेत पोहोचली. मुलेही सुखरूप होती. बसचालकाला रस्ताच माहीत नसल्यामुळे तो वाट चुकल्याचे नंतर स्पष्ट झाले. पण एकूणच या निष्काळजीपणामुळे पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मुलांसाठी बसेस पुरवणाऱ्या रमेश यादव नावाच्या या काँट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्ट आता रद्द करण्यात आले आहे. रमेश यादव याच्या रमेश ट्रॅव्हल्स या कंपनीच्या माध्यमातून १४ बसेस पोदार स्कुलसाठी चालवल्या जात होत्या, असे स्पष्ट झाले आहे. काल मुलांना घेऊन निघालेली बस रुट माहीत नसल्याने तीन ते चार तास खोळंबली होती. मूल वेळेत घरी न पोहोचल्याने पालकांनी तक्रार करत शाळा गाठली होती. यानंतर पोलीस आणि शिक्षण विभागाने हस्तक्षेप केल्यानंतर काँट्रॅक्टरवर कारवाई केल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे ही वाचा:

कुठे आहे कायदा सुव्यवस्था? नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या

‘देशात लोकशाही कुठे आहे? दबावशाहीचे राजकारण सुरू आहे’

ताजमहालला जेवढे पैसे खर्च झाले, तेवढ्या पैश्यात देशाची गरिबी हटली असती

… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’

 

कोरोनाचा कहर थांबल्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या असल्या तरी या घटनेमुळे पालकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. दुपारी १२.३० ला निघालेली मुले साडेचारपर्यंत पोहोचलीच नाहीत परिणामी पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी शाळा गाठून तक्रार केली शेवटी त्या चालकाला रस्ता सापडल्यानंतर तो शाळेकडे आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा